जऊळके वणी गाव हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. जऊळके वणी हे गाव श्री संत मल्हारी बाबा यांच्या नावाने ओळखले जाते. त्यांची जन्मभूमी म्हणून या गावाकडे आस्थेने पाहिले जाते. तुकाराम महाराजांच्या नंतरच्या काळात श्री संत मल्हारी बाबा हे संत उदयास आले होते. जऊळके वणी हे गाव इंदोर महामार्गाच्या कडेला वसलेले असल्यामुळे ते इतर राज्यांशी जोडले गेले आहे. गावाचा महत्वाचा व्यवसाय शेती असून बरेच उद्योगधंदे देखील आहेत. शेतीसाठी लागणारे पाणी हे जवळच असणाऱ्या धरणातून उचलले जाते.
जऊळके वणी या गावात एकूण 307 कुटुंबे असून बरेच कुटुंबांचा उपजीविकेचा व्यवसाय हा शेती आहे. शेतीमध्ये द्राक्ष हे महत्वाचे पीक आहे. त्यामुळे परदेशात द्राक्ष मोठ्या प्रमाणात निर्यात होऊन बरेच कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. गावात सुला विनियार्ड्स कंपनी असल्यामुळे लोकांना गावातच रोजगार उपलब्ध होतो. आठवडे बाजार पिंपळगाव व खेडगाव या गावात अनुक्रमे रविवारी व सोमवारी भरतो. त्यामुळे गावातील लोकांच्या शेत मालाला भाव देखील मिळतो व उपजीविकेसाठी धान्य, भाजीपाला देखील मिळतो. गावात ग्रामपंचायत चे जुने इमारतीत कार्यालय असून नवीन कार्यालयाचे बांधकाम सुरु असून मागील बाजूस मल्हारी बाबा यांचे समाधी मंदिर आहे. तसेच तसेच त्यासमोर मोठे सभा मंडप आहे, त्यामुळे गावातील लग्न समारंभ व धार्मिक कार्यक्रम तेथे होतात. सदर सभामंडपामुळे साई भक्तांना निवासासाठी आश्रय मिळतो. मंदिराच्या मागील बाजूस गावाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. तेथे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. नंतर च्या शिक्षणाची सोय गावातील स्व. के. आर. डोखळे या हायस्कूल मध्ये इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत आहे. कॉलेज च्या शिक्षणासाठी गावातील मुलांना जवळच असणाऱ्या कादवा कारखाना कॉलेज व पिंपळगाव कॉलेज मध्ये जावे लागते.
गावात तीन मिठाई ची दुकाने व सहा किराणा दुकाने आहेत. दोन सलून, दोन वेल्डिंग गॅरेज, दोन कृषी सेवा केंद्र आहेत. तसेच शनी देव, खंडेराव महाराज ,हनुमान, पिर बाबा, मल्हारी बाबा यांची मोठी मंदिरे आहेत. त्यापैकी पिर बाबा ची यात्रा गावात मोठ्या उत्सवात पार पडते. गावातील काही घरे मातीची तर काही सिमेंट मध्ये बांधलेली आहेत. गावातील रस्ते डांबरीकरण व सिमेंट काँक्रिट चे आहेत. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून तीन विहिरी आणि पाणी साठवण्यासाठी एक तळे बांधण्यात आलेले आहे.गावात सार्वजनिक आरोग्याच्या देखभालीसाठी 2 दवाखाने व एक पशुवैद्यकीय उपचार आहे.
सरपंच
श्री. योगेश पांडुरंग दवंगे हे जऊळके वणी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्यरत आहेत. गावाचा सर्वांगीण विकास, ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे आणि शासकीय योजना प्रभावीपणे राबविणे यासाठी ते सदैव तत्पर आहेत. युवक नेतृत्वाच्या माध्यमातून गावात शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रांत लक्षणीय प्रगती घडवून आणण्याचा त्यांचा ध्यास आहे.
त्यांच्या कार्यकाळात ग्रामसभेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. पारदर्शक प्रशासन, जबाबदार निर्णयप्रक्रिया आणि सामाजिक बांधिलकी या तत्त्वांचा आधार घेत ते गावकऱ्यांमध्ये विश्वास व आपुलकी निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.
श्री. दवंगे हे गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने नवीन योजना आणण्याचा आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असून "आदर्श गाव" निर्माण करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.
29/09/2025, 10:05 pm
सन २०२४-२०२५ या वर्षात जऊळ्के वणी गावाचे सरपंच श्री.योगेश पांडुरंग दवंगे यांना शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी साठी सदर पुरस्काराने राज्य स्तरावर गौरविण्यात आले.
27/09/2025, 01:31 pm
सन २०२३-२०२४ या वर्षात जऊळ्के वणी गावाला तालुका स्तरीय तालुका सुंदर गाव म्हणून सन्मानित करण्यात आले.
10/09/2025, 09:15 pm
ग्रामपंचायत जऊळ्के वणी यांना सन २०२३-
२०२४ मध्ये जिल्हा परिषद नाशिक यांचेकडून सदर
पुरस्काराने गौरविण्यात आले.
26/09/2025, 10:17 pm
सन २०१६-२०१७ या वर्षात जऊळ्के वणी
गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात
तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
हर घर जल हर घर नल योजनेमार्फत सर्व कुटुंबाना स्वतंत्र नळ कनेक्शन हर घर जल हर घर नल योजनेमार्फत सर्व कुटुंबाना स्वतंत्र नळ कनेक्शन
हवामान व पर्जन्यमान विषयक माहिती व शेती रोग विषयक गावात मोबाईल SMS मार्फत कळविली जाते .
प्राथमिक व माध्यामिक १ ते १० शाळा
महिला व बाल कल्याण
दूरसंचार-गावात इंटरनेट व नेटवर्क कनेक्टिविटी साठी मनोरे
गावात सामाजिक सभा मंडप मल्हार बाबा मंदिरयेथे असून सार्वजनिक कार्यक्रम विवाह सोहळा वर्षश्राद्ध , धार्मिक विधी होतात
CCTV - गावात जागोजागी ३२ ठिकाणी CCTV बसविले असून गाव निगराणीत आहे.
गावात युवकांसाठी स्वतंत्र व्यायाम शाळा इमारत
जनसुविधा अंतर्गत दुमजली सुसज्य ग्रामपंचायत कार्यालयाचे काम प्रगती पथावर
नागरिकांसाठी दाखले वितरण व online सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे सेंटरख्या
ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना व युवतींना मासिक पाळी व्यवस्थापनासाठी वर्षभर सेनेटरी पॅड चा पुरवठा केला जातो.ंख्या
ग्रामपंचायतीकडून मयत व्यक्तींचा गोशाळे मार्फत पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार मोफत केला जातो.
तीसगाव धरण हे दिंडोरी तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण आहे, जे पाराशरी नदीवर बांधले आहे. हे धरण जऊळ्के वणीपासून ६ कि.मी.अंतरावर असून, मुसळधार पावसामुळे या धरणांच्या साठ्यात वाढ होते आणि शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होते.
सदर कंपनी जऊळ्के वणी गावात असून तिचे वैशिष्ट्य खालील प्रमाणे. सुला ही भारतातील सर्वात मोठी वाईनरी आहे. येथे विविध प्रकारच्या वाईन (रेड वाईन, रोझ वाईन इ.) तयार केल्या जातात. येथे वाईनरीचा टूर उपलब्ध आहे, ज्यात द्राक्षाच्या शेतात फिरणे आणि वाईन कसे तयार होते हे पाहता येते. तुम्ही द्राक्षबागेला भेट देऊन वाईन टेस्टिंगचा अनुभव घेऊ शकता. सदर कंपनी मुळे गावातील महिलांना व युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे.
पंचायत समिती दिंडोरी
गटविकास अधिकारी – श्री.भास्कर रेंगडे