हेल्पलाइन क्र: 7894561236
Visitors: 600
📢 ठळक सूचना: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज आभियान विशेष ग्रामसभा दिनांक 17/9/2025
...

23-09-2025 , 10:54 PM

CCTV कॅमेरा युक्त गाव

जऊळ्के वणी गावात ग्रामपंचायतने चौका चौकात CCTV कॅमेरे बसविले असून त्यामुळे पूर्ण गावाची निगराणी ठेवली जात आहे.

...

09-10-2025 , 10:54 PM

हवामान केंद्र

ग्रामपंचायतने ग्रामपंचायत गाळ्यांवर हवामान केंद्र बसविले असून हवामानाची माहिती तापमान ,पाऊस,१८ प्रकारचे गावातील पिकांवरील कोणते रोग ,कीड पडेल हि सर्व माहिती सर्व शेतकऱ्यांना मोबाईल aap fyllo मध्ये बघता येते.

...

20-10-2024 , 03:04 PM

घंटागाडी

ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छतेसाठी घंटागाडी सेवा सुरू करण्यात आली आहे. या वाहनाच्या मदतीने दररोज गावातील घराघरातून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा केला जातो. ग्रामस्थांनी घरातून कचरा बाहेर काढून घंटागाडीमध्ये देणे अपेक्षित आहे.या उपक्रमामुळे गाव स्वच्छ, निरोगी व प्रदूषणमुक्त ठेवण्यास मदत होत आहे. स्वच्छ भारत अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ही सेवा राबविण्यात येत असून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग हाच यशाचा मुख्य घटक आहे.

...

11-11-2025 , 11:43 AM

मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी मुलींच्या नावाने पोस्टात एफ डी काढणे

जऊळके वणी येथील सन 2024/25 वर्षातील जन्माला आलेल्या 3 मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी 10 टक्के महिला व बालकल्याण निधीतून मुलींचे पोस्टात खाते उघडून त्यांचे खात्यावर प्रत्येकी 15000 रुपये जमा करून एफडी उघडण्यात आली 

...

05-12-2025 , 11:50 AM

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिक

ग्रामपंचायत जऊळके वणी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेस श्री हेमंत कापसे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

...

03-12-2025 , 12:00 PM

बचत गट महिलांना स्वयं रोजगार प्रशिक्षण

ग्रामपंचायत जऊळके वणी येथे स्वयं रोजगारासाठी 50 महिलांना अगरबत्ती व मेणबत्ती तयार करणे कामी प्रशिक्षण देण्यात आले.

...

13-11-2025 , 10:30 AM

गावातील मयत व्यक्तींचे ग्रामपंचायत कडून पर्यावरणपूरक व मोफत अंत्यसंस्कार

जऊळके वणी गावात पर्यावरण रक्षणासाठी व लाकूड वापर बंद होणेसाठी गो शाळेकडून गोवऱ्यामध्ये  मयत व्यक्तींचे पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार ग्रामपंचायत कडून मोफत केले जातात.

...

12-02-2026 , 10:30 AM

गावात व वस्तीवर सौर पथदिवे बसविणे

अपारंपरिक उर्जा स्त्रोत वापर वाढविण्यासाठी गावात व वस्तीवर प्रत्येक घरासमोर ग्रामपंचायत व CSR अंतर्गत सौर पथदिवे बसविण्यात आले.

...

22-01-2026 , 10:45 AM

महिला व युवतींना वर्षभर मोफत sanitary pad पुरविणे.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीच्या काळात sanitary pad चा वापर होणे गरजेचे आहे.त्या दृष्टीने ग्रामपंचायत कडून महिला व युवतींना वर्षभर व मोफत sanitary pad चा पुरवठा केला जातो.