02/09/2025, 11:41 pm
ग्रामपंचायतीच्या वतीने गावात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात गावकऱ्यांची मोफत तपासणी करून आवश्यक औषधोपचार आणि मार्गदर्शन देण्यात आले.
06/09/2025, 10:04 pm
अमृतकुंभ वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत गावात 200 आंबे व इतर रोपांची लागवड दिनांक 6/9/2025 रोजी करण्यात आली.
20/09/2025, 10:05 am
भारत सरकारची आयुष्मान भारत योजना – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत पात्र नागरिकांना मोफत व कॅशलेस आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान गोल्डन कार्ड दिले जाते. या कार्डामुळे प्रत्येक कुटुंबाला वार्षिक ₹५ लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळते.
24/09/2025, 10:00 am
आयुष्मान गोल्डन कार्ड काढणे व महिलांसाठी आरोग्य शिबीर अंतर्गत एच बि तपासणी करणे कामी दिनांक २४/९/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे कॅम्प आयोजित करण्यात आला.
17/09/2025, 10:00 am
दिनांक १७/९/२०२५ रोजी संत मल्हारी बाबा सभागृह येथे विशेष ग्रामसभा घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.या वेळी सरपंच उपसरपंच ,सदस्य ,पोलीस पाटील,श्री गणपतराव पाटील,श्री सुनील पाटील ,ग्रामस्थ व ग्रामस्तरीय कर्मचारी उपस्थित होते.
18/11/2025, 10:32 am
दिनांक 18/11/2025 रोजी आयुष्मान गोल्डन कार्ड घेऊन 55 लाभार्थी यांचे नोंदणी करून कार्ड काढण्यात आले.
15/11/2025, 09:38 am
दिनांक 15/11/2025 रोजी ग्रामपंचायत जऊळके वणी येथे ग्रामस्थांनी व महिलांनी एकत्र येऊन श्रमदानातून गाव स्वच्छता केली,
03/12/2025, 11:11 am
दिनांक ०३/१२/२०२५ रोजी ग्रामपंचायत विभाग व आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करणेकामी कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन १९४ महिलांची तपासणी करण्यात आली.
26/01/2026, 11:30 am
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्याचा गृहप्रवेश चावी व प्रमाण[पत्र देऊन करण्यात आला.